संकीर्ण माहिती

एफआरपी म्हणजे काय? तो कसा परिगणित करतात?

एफआरपी म्हणजे रास्त आणि किफायतशीर भाव, जो साखर कारखान्यांद्वारे, गाळपासाठी कारखान्यास ज्यांनी त्यांचा ऊस दिला आहे अशा ऊस पुरवठादार / उत्पादकांना अदा करावयाचा किमान भाव असतो. साखर नियंत्रण आदेश, १९६६ च्या खंड ३ मधील तरतुदीनुसार सन २००९ पूर्वी साखरेच्या प्रत्येक हंगामासाठी ऊसाचा सांविधिक किमान भाव (एसएमपी) केंद्र शासनाकडून निर्धारित करण्यात येत होता. सांविधिक किमान भावाची परिगणना करताना खालील घटकांचा विचार करण्यात आला आहे:-

  • ऊसाच्या उत्पादनाचा खर्च.
  • पर्यायी पिकापासून उत्पादकांना परतावा आणि कृषि मालाच्या किंमतीचा सर्वसाधारण कल.
  • ग्राहकांना रास्त भावात साखरेची उपलब्धता.
  • ऊसापासून बनविण्यात आलेल्या साखरेची ऊस उत्पादकांद्वारे विक्रीची किंमत.
  • ऊसापासून साखरेची पुनर्प्राप्ती.
  • उप उत्पादने जसे की, काकवी, ऊसाची चिपाडे, गाळ (प्रेस-मड) यांच्या विक्रीपासूनचे उत्पन्न किंवा त्यांचे आरोपित मूल्य.

दि. २२ ऑक्टोबर २००९ रोजीच्या, साखर नियंत्रण आदेशामध्ये खंड (ग) द्वारे सुधारणा करण्यात आली असून, त्यामध्ये ऊस उत्पादकांच्या जोखीमा आणि लाभ विचारात घेऊन, माफक नफा मिळण्याची तरतूद केलेली आहे. त्यानुसार दि. १.१०.२००९ पासून अंमलात येणा-या २००९-१० पासूनच्या साखरेच्या हंगामांचा रास्त व किफायशीर भाव (एफआरपी) निश्चित करण्याची शक्ती केंद्र शासनास प्रदान करण्यात आली आहे.-

विविध राज्य सरकारे आणि साखर उद्योग आणि ऊस उत्पादकांचे संघ यांचेशी विचारविनियम करून, कृषि परिव्यय व मूल्य आयोगाच्या (सीएसीपी) शिफारशींच्या आधारावर सांविधिक किमान भाव / रास्त व किफायतशीर भाव (एसएमपी/ एफआरपी) निश्चित केले जातात. २०११-१२ च्या हंगामासाठी केंद्र शासनाकडून उताऱ्यामध्ये प्रत्येकी ०.१ % बिंदूने वाढ होण्यासाठी रू. १.५० च्या वाढीसह, ९.५ % दराच्या मूळ उताऱ्याशी निगडीत, ऊसाच्या प्रति क्विंटलला रू. १४५ असा, ऊसाचा रास्त व किफायतशीर भाव निश्चित करण्यात आला आहे. २००१-२००२ पासून साखर हंगामासाठी साखर कारखान्यांद्वारे देय असलेला ऊसाचा एसएमपी/एफआरपी खालीलप्रमाणे आहे:-

साखर हंगाम एसएमपी/एफआरपी प्रति क्विंटल उतारा (%)
2001-02 62.05(SMP) 8.5
2002-03 69.50(SMP) 8.5
2003-04 73.00(SMP) 8.5
2004-05 74.50(SMP) 8.5
2005-06 79.50(SMP) 9
2006-07 80.25(SMP) 9
2007-08 81.18(SMP) 9
2008-09 81.18(SMP) 9.5
2009-10 107.76(SMP) 9.5
2009-10 129.84(FRP) 9.5
2010-11 139.12(FRP) 9.5
2011-12 145.00(FRP) 9.5
2012-13 190.00(FRP) 9.5
2013-14 210.00(FRP) 9.5
2014-15 220.00(FRP) 9.5
2015-16 230.00(FRP) 9.5
2016-17 230.00(FRP) 9.5
2017-18 255.00(FRP) 9.5

हवाई अंतर प्रमाणपत्राबाबत माहितीः

साखर उद्योग मुक्त झाल्यानंतर ऊस मिळविण्यासाठी साखर कारखान्यांमध्ये चढाओढ सुरु झाल्याने ऊस नियंत्रण आदेशान्वये प्रदान केलेल्या शक्तीचा वापर करुन अस्तित्वातील व नवीन साखर कारखान्यांमधील हवाई अंतर १५ कि.मी. असावे असे दिनांक १०.११.१००६ रोजीच्या राजपत्राने केंद्र शासनाने प्रसिध्द केलेले आहे. सदरचा आदेश शासकीय राजपत्रात प्रसिध्द झालेल्या दिनांकापासून म्हणजे दिनांक १०.११.१००६ पासून लागू करण्यात आलेला आहे.

कलम ६ अ मधील तरतूदीनुसार १५ कि.मी. हवाई अंतराच्या त्रिज्येच्या कक्षेत दोन साखर कारखाने उभारणी बाबत निर्बंध आहे. यामध्ये एक किंवा दोन किंवा अधिक राज्यामध्ये अस्तित्वात असलेल्या अथवा नवीन साखर कारखान्यापासून १५ कि.मी. हवाई अंतरच्या त्रिज्येच्या कक्षेत कोणताही नवीन साखर कारखाना उभारण्यात येणार नाही अशी तरतूद आहे. तथापि केंद्र शासनाच्या पूर्व मान्यतेनुसार कमीत कमी असलेले १५ कि.मी. हवाई अंतर वाढविणेबाबत अधिसुचित करण्यासाठी राज्य शासनास प्राधिकृत करण्यात आलेले आहे. कलम ६ (क) स्पष्टीकरण ३ नुसार हवाई अंतर सर्व्हे ऑफ इंडिया यांचेकडून मोजून घेतल्यानुसार निर्धारीत करण्यात यावे. कलम (ख) मध्ये ओद्योगिक उद्योजकता ज्ञापन दाखल करण्याबाबतची तरतूद नमूद केलेली आहे. औद्योगिक उद्योजकता ज्ञापन दाखल करण्याअगोदर संबंधितांनी राज्य शासनाच्या साखर आयुक्त अथवा संचालक (साखर) यांचेकडून हवाई अंतर प्रमाणपत्र प्राप्त करुन घ्यावयाचे आहे. सदर औद्योगिक उद्योजकता ज्ञापन प्राप्त झाल्यानंतर संबंधीतांनी मा.मुख्य संचालक (साखर), नवी दिल्ली यांचेकडे सदर औद्योगिक उद्योजकता ज्ञापनाचे पालन विविक्षित वेळेत होणेसाठी रु. एक कोटीची बँक गॅरंटी तारण ठठेवणे आवश्यक आहे. उक्त दोन्ही तरतूदींचे तंतोतंत पालन न झाल्यास औद्योगिक उद्योजकता ज्ञापन रद्दबातल होते.

केंद्र शासनाच्या पूर्व मान्यतेने महाराष्ट्र शासनाने दिनांक ०३.१२.२०११ रोजी प्रसिध्द केलेल्या राजपत्रात दोन साखर कारखान्यांमधील किमान हवाई अंतर २५ कि.मी.असणे आवश्यक आहे.

माहितीसाठी :

  1. केंद्र शासन राजपत्र दिनांक १०.११.२००६– ऊस नियंत्रण आदेश १९६६ (सुधारणा २००६)
  2. राज्य शासन राजपत्र दिनांक ३०.१२.२०११.

दृष्टिक्षेपात महाराष्ट्रातील साखर उद्योग

शीर्षक फाईल
दृष्टिक्षेपात महाराष्ट्रातील साखर उद्योग डाऊनलोड करा

मा. मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतील अंशदान

महाराष्ट्रातील साखर उद्योग हा मा. मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीतील प्रमुख अंशदाता आहे. खालील तक्ता राज्यातील साखर कारखान्यांनी ह्या निधीला दिलेले वर्षानिहाय अनुदान दर्शवितो:

मा . मुख्यमंत्र्यांच्या सहाय्यता निधीबाबतची माहिती
अ.क्र. गाळप हंगाम जमा केलेला निधी (रु. कोटीत)
1 2005-06 12.55
2 2006-07 4.12
3 2007-08 6.96
4 2008-09 13.37
5 2009-10 15.04
6 2010-11 15.43
7 2011-12 15.42
8 2012-13 15.97
9 2013-14 7.55
10 2014-15 9.87
11 2015-16 13.67