|
स्फटिकयुक्त, पांढरी, अति शुध्द अथवा दैनंदिन वापरातील साखर
ही ऊस अथवा बीटपासून तयार केलेली उच्च दर्जाची शुध्दीकृत साखर असते. ही साखर घन अथवा गोळयांच्या स्वरूपात विविध आकार आणि प्रकारांमध्ये उपलब्ध असते. सर्वसाधारणपणे घरांमध्ये ही साखर दैनंदिन वापरात असल्याचे दिसून येते.
|
|
सुपरफाईन, अल्ट्राफाईन अथवा बार साखर (कॅस्टर साखर) ही अधिक छोटया स्फटिकांची साखर असते, जी चटकन विरघळते. या साखरेच्या स्फटिकांचा आकार इतका सूक्ष्म असतो की केक, चॉकलेट आणि शीतपेयांमध्ये या साखरेचा वापर उपयुक्त ठरतो.
|
|
फळ शर्करा ,ही आपल्या दैनंदिन वापरातील साखरेपेक्षा थोडी जास्त सूक्ष्म असते, तसेच तिच्या स्फटिकांचा आकार एकसारखा असतो.जिलेटीन,पुडींग आणि शीतपेयांमध्ये वापर करण्याच्या दृष्टीने ही साखर उपयुक्त असते.
|
|
मिठाईसाठीची अथवा पूड स्वरुपातील साखर(पिठीसाखर) बारीक आणि मुलायम पूड स्वरुपातली ही साखर बारीक दळलेली असते. त्याच्या गाठी तयार होऊ नयेत, यासाठी त्यात काही प्रमाणात स्टार्च मिसळलेले असते. ती विविध आकारातील स्फटिकांमध्ये, सुपरमार्केट सारख्या ठिकाणी सहज उपलब्ध होते.
|
|
जाडीभरडी साखर याचे खडे नियमीत साखरेपेक्षा मोठे असतात आणि ती साखरेच्या मद्यापासून तयार केली जाते. ही साखर तयार करावयाच्या विशिष्ट प्रक्रियेमुळे त्यातील फ्रुक्टोज आणि ग्लुकोज अत्युच्च तापमानात तग धरून राहतात, त्यामुळे ती मद्यनिर्मितीमध्ये उपयुक्त ठरते.
|
|
तपकिरी/ब्राऊन शुगरही मुलायम स्वरुपाची साखर असून पांढरी साखर आणि मळी यांच्या मिश्रणापासून तयार केली जाते. याचे सार्वत्रिक आढळणारे दोन प्रकार आहेत. फिकट आणि गडद. यापैकी फिक्कट तपकिरी साखर अधिक चवदार असते.
|